16 November 2025
Created By: Atul Kamble
त्वचेला सारखी खाज येत असेल तर हलक्यात घेऊ नका हे काही आजाराचे संकेत असू शकतात
एखादे प्रोडक्ट, कापड, साबण किंवा अन्नातून एलर्जी झाली असेल तर सातत्याने खाज येते. एलर्जीत त्वचेवर लालसर पुळ्या,जळजळ किंवा सूजही येते
रिंगवर्म,दाद, वा जॉक इच सारखे फंगल इन्फेक्शनमध्ये वारंवार खाज येते. हे फंगल इन्फेक्शन बहुदा ओलसर जागेवर अधिक पसरते.
ड्राय स्कीन - थंडीत जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा तडतडते. ड्राय स्कीनमध्ये पांढरा थर आणि सातत्याने खाज येते.
एक्झिमा - एक्झिमा झाल्यानंतर त्वचेवर सूज, लालसरपणा आणि खाज वाढते,ही एक क्रॉनिक समस्या आहे. त्यात वारंवार लक्षणे वाढतात
लिव्हरसंबंधीत आजारात बिलरुबिन वाढल्याने खाज येते. यात त्वचा पिवळी पडणे,भूक कमी होणे सारखी लक्षणे दिसतात.
किडनी समस्या - किडनी नीट प्रकारे टॉक्सिन्स बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे ही शरीरात खाज येते. संपूर्ण शरीरास खाज येते. रात्री जास्त वाढते.