GK: विमानाच्या खिडक्यांचे टोक गोलाकार का असतात?

15thJuly 2026

Created By: Aarti Borade

टोकदार चौकोनी खिडक्यांच्या कोपऱ्यांवर दाब खूप जास्त पडतो, ज्यामुळे तडा पडण्याचा धोका वाढतो.

१९५३ मध्ये डी हॅविलँड कॉमेट विमानाच्या तीन अपघातांमध्ये चौकोर खिडक्यांमुळे तडा जाऊन विमान हवेतच तुटले

केबिनमध्ये उंचीवर हवेचा दाब सतत बदलत असतो, ज्याचा दाब टोकदार कोपरे सहन करू शकत नाहीत

गोलाकार किंवा अंडाकार खिडक्यांमध्ये कोपरे नसल्याने दाब समान रीतीने पसरतो आणि तडा पडण्याचा धोका कमी होतो

गोल खिडक्या सुरक्षा, कमी वजन आणि प्रवाशांच्या आरामासाठीही अधिक चांगल्या मानल्या जातात

आज इंडिगो, एअर इंडिया, बोइंग आणि एअरबससारख्या सर्व विमानांमध्ये गोल कड्यांच्या खिडक्या वापरल्या जातात