24 सप्टेंबर 2026
Created By: Atul Kamble
भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
रेल्वेने देशात दैनंदित २ कोटी प्रवाशी रोजचा प्रवास करतात.
रेल्वेने तुम्ही कधी ना कधी प्रवास केला असेलच, रेल्वेतील काही स्थानकाला जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस असे नाव दिलेले तुम्ही पाहिले असेल.
ज्या रेल्वेस्थानकातून दोन किंवा अधिक मार्ग निघत असतात त्यांना जंक्शन असे म्हणतात.
मथुरा हे देशातील सर्वात मोठे जंक्शन आहे.येथून सात मार्ग जातात.
ज्या रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पुढे सेंट्रल असते, ते स्टेशन शहरातील सर्वात जुने आणि प्रमुख रेल्वे स्टेशन असते.
टर्मिनल किंवा टर्मिनसचा अर्थ म्हणजे शेवटचे स्टेशन.जेथे गाड्या टर्मिनेट होतात. या स्टेशनच्या नंतर कोणतेही स्टेशन नसते.