11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
शिंपले आणि कालव्यामध्ये मोती कसे तयार होतात?
13 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
मोत्याचं आकर्षण कायम राहिलं आहे. अंगठी आणि लॉकेटमध्ये मढवून परिधान केला जातो. पण हा मोती बनतो कसा?
नैसर्गिकरित्या कालवं आणि शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. कालवं एक समुद्री जीव असून 20 वर्षे जगतो.
प्रौढ कालव्यामध्ये मोती तयार करण्याची क्षमता असते. एक वर्षाच्या पुढे वाढलेले कालवं प्रौढ मानली जातात.
जेव्हा बाहेरची वाळू किंवा खडे शिंपले किंवा कालव्यात जाते. तेव्हा बचावासाठी कालवं एक प्रकारचा द्रव पदार्थ सोडतात.
या द्रव पदार्थाला नॅक्रे म्हणतात. कालांतराने त्याचे अनेक थर खड्यावर जमा होतात. त्याला मदर ऑफ पर्ल असं संबोधलं जातं.
हळूहळू या थराचं रुपांतर मोत्यात होतं. कालवं आणि शिपल्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या रंगाचे मोती तयार होतात.
जगात 200 प्रकारची कालवं आहेत. कालवांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता देखील आहे.