यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोपावरुन अटक झाली आहे. त्यात शहजाद बहाबचे नाव आले आहे.
19 May 2025
Created By : जितेंद्र झंवर
माध्यमांमधील वृत्तानुसार, ज्योती मल्होत्रा दिल्लीला जात असल्याचे सांगून पाकिस्तानात जात होती. लग्झरी सवयी पूर्ण करण्यासाठी तिने हा उद्योग केला.
गुप्तचर संस्था आपल्या शत्रूसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी मोठी रक्कम खर्च करत असतात. त्या रक्कमेची माहिती मिळत नसते.
बिजनेस इनसाइडरमधील रिपोर्टनुसार, चीनने नाटोच्या रिसर्च सेंटरमधील युद्धनौका आणि सबमरीनची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकाला 20 हजार डॉलर म्हणजे 17 लाख रुपये दिले होते.
अमेरिकेतील गुप्तचर संस्था, सीआयएचे माजी प्रमुख जोना मेंडेज यांनी सांगितले की, गुप्तहेरांचा पगार आणि परराष्ट्र सेवेत काम करणाऱ्यांच्या पगारात काहीच फरक नसतो.
गुप्तहेराकडून मिळणारी माहिती किती महत्वाची आहे, त्यावर त्याला मिळणारे पैसे निश्चित होतात. अमेरिकेचा एजेंट एडॉल्फ टोलकाचेव याचा बिलियन डॉलरमध्ये पगार मिळत होता.
रशियाची गुप्तचर संस्था एफएसबीच्या डायरेक्टर अलेक्जेंडर बोर्टनिकोव यांचा वार्षिक पगार रशियाच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा 20 टक्के जास्त होता.
चीनकडूनही आपल्या गुप्तहेरांवर मोठा खर्च केला जात असतो. चीन अनेक देशातील माहिती गुप्तहेरांकडून मिळत असतो.