पिरॅमिडमधील ममी हजारो वर्षे टिकल्या कशा? जाणून घ्या थक्क करणारं सत्य!
23 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
पिरॅमिडमधील ममी हजारो वर्षे टिकून राहण्यामागे प्राचीन इजिप्शियन लोकांचे अद्भुत तंत्रज्ञान होते.
मृतदेह सडू नये म्हणून त्यातील ओलावा काढून टाकला जात असे आणि काही अवयव देखील काढले जात.
ममी तयार करण्यासाठी नैसर्गिक नॅट्रॉन मीठाचा वापर केला जात असे.
त्यानंतर मृतदेहाला लिननच्या कापडाने काळजीपूर्वक गुंडाळले जात असे.
पिरॅमिडमधील कोरडे वातावरण आणि मृतदेह जतन करण्याच्या पद्धतीमुळे ममी दीर्घकाळ टिकण्यास मदत झाली.
प्राचीन इजिप्तमधील ही रहस्यमय ममी बनवण्याची प्रक्रिया आजही इतिहासकार आणि संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.