पाण्याची प्लास्टिकची बाटली किती दिवसांनी बदलायची असते ?

Created By: Atul Kamble

17 March 2026

बाजारात मिळणारे पॅक बंद पाण्याची बाटली ( बिसलेरी ) केवळ एकादाच वापरायची असते

काही काळानंतर प्लास्टिकमध्ये बारीक फटी पडतात. त्यात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात.

चांगल्या क्वालिटीच्या ( BPA फ्री ) प्लास्टिक बाटल्यांना 6 ते 12 महिन्यात बदलायला हवे

प्लास्टिकच्या बाटल्या उन्हात तापत्या कारमध्ये  वा थेट उन्हात ठेवू नये.

 धुतल्यानंतर बाटलीचे झाकण खुले ठेवा आणि त्यास उलटी करुन पूर्णपणे सुखवावे

जर काचेची बाटली कुठून तडकली किंवा फुटली नसेल तर ती वर्षानुवर्षे वापरता येते.

स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात.

जर यांना गंज लागला नाही आणि आतील बाजू खराब झाली नाही तर यांना २ ते ३ वर्षे किंवा त्याहून जास्त काळ वापरता येते.

तांब्याच्या बाटल्या ६ ते ९ महिन्यांनी बदलाव्या किंवा त्यांची आतील बाजू नीट स्वच्छ करायला हवी.