अंडी ताजी की शिळी ओळखण्याची  ट्रीक काय ?

19 september 2025 

Created By: Atul Kamble

अंडी खरेदी करताना मनात प्रश्न येत असतो की ही ताजी आहेत की शिळी कसे ओळखावे

असा कोणता उपाय आहे का अंडी ताजी की शिळी ओळखण्याचा,चला तर पाहूयात

एका वाटीत पाणी भरावे आणि अंडे त्यात टाकावे अंडे जर तळाशी जाऊन बसले तर ते अंडे ताजे आहे

जर अंडे पाण्याच्या वाटीत न बुडता तरंगू लागले तर ते शिळे आहे हे समजावे

अंडे हलवून कानाच्या जवळ नेऊन आवाज ऐकावा जर पाण्याचा आवाज येत असेल तर ते शिळे आहे.

जर अंड्यातून काही आवाज आला नाही तर ते ताजे आहे. कारण ताज्या अंड्याचा बलक आणि पाण्यासारखा भाग घट्ट असतो.

अंडे तोडल्यानंतर त्याच्या पिवळ्या बलकावर लक्ष द्यावे, त्याचा रंग पिवळा किंवा थोडासा ऑरेंज असू शकतो

अंड्याचे बलक काळे,डार्क लाल डागांचे असेल तर अंडे शिळे आहे हे समजावे

अंडी प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. परंतू खूप शिळी अंडी खाल्ल्याने अपचन, किंवा उलट्या-जुलाब होऊ शकतात.