वारंवार ताप येणं कोणत्या रोगांचं लक्षण? दुर्लक्ष केल्यास..

03 September 2025 

Created By : Manasi Mande

वारंवार ताप येणं  हे फक्त व्हायरलचं लक्षण नव्हे तर ते शरीरात लपलेल्या अनेक गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

डॉ. सांगतात की टायफॉइड असेल तर वारंवार , सतत ताप येतो. बॅक्टेरिया, अशुद्ध पाण्यामुळे हे होऊ शकतं.

डासांमुळे पसरणारे डेंग्यू, मलेरिय सारखे आजार यामुळेही सतत ताप येतो. त्यामध्ये डोकेदुखी, अंग दुखणं, थकवा अशी लक्षणं असतात.

टीबी असेल तर बराच काळ हलका-हलका ताप येतो. तसेच रात्री घाम येणं, वजन कमी होणं हेही दिसतं.

सतत ताप येऊन लघवी करताना दुखत असेल तर ते यूरिनरी ट्रॅक्ट  इनेफ्कशन  (UTI)  असू शकतं. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

काही ऑटोइम्यून आजारांमुळेही सतत ताप येऊ शकतो.

वारंवार ताप येत असेल, आठवडाभर असेल,इतर लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांना दखवून टेस्ट करून घ्या. अंगावर काढू नका, नाहीतर महागात पडेल.