तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अनेक जण पितात. कारण आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत.

19 May 2025

Created By : जितेंद्र झंवर

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने पोटातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. यकृतमधील विषारी पदार्थ बाहेर टाकले जाते आणि पचन सुधारते. 

सांधेदुखी कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे. पण हे पाणी पिताना कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या.

तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये ठेऊन अनेक जण पाणी पितात. परंतु हे पाणी सामान्य तापमानातील असेल तरच पूर्ण फायदे मिळतात. थंड पाणी पचन आणि मेटाबॉलिज्मसाठी नुकसानदायक असते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात चुकूनही लिंबू किंवा कोणतेही आंबट पदार्थ टाकू नका. अन्यथा उलट्या, मळमळ, अतिसार, छातीत जळजळ इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

दिवसभर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे नुकसानदायक ठरु शकतो. फक्त सकाळीच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी घ्या. 

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सहा ते सात तासानंतर घ्या. त्यापेक्षा जास्त कालावधी ठेवलेले पाणी पिऊ नका. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी लगेच पिल्यास फायदा होत नाही. 

तांब्याचे भांडे नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यास नुकसान होऊ शकतो.