या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाची होती तरतूद
Created By: Atul Kamble
24 january 2026
जांभळा रंग अनेकांना आवडतो. वांगी कलरच्या साड्या महिलांना आवडतात. परंतू एकेकाळी एका देशात जांभळा रंगाचे कपडे घातले की शिक्षा व्हायची
प्राचीन रोमन साम्राज्यात टायरियन पर्पल नावाचा वांगी कलर खूपच महाग होता. याला तयार करण्यासाठी हजारो समुद्री गोगलगायी ( शंख) लागायचे
रोममध्ये जांभळा रंग रॉयल फॅमिली आणि उच्च पदस्य अधिकाऱ्यांसाठी राखीव होता. सम्राट संपूर्ण वांगी कलरचा पोशाख परिधान करायचा.
रोमन सम्राटांनी सुम्प्चुअरी लॉ तयार केले होते.त्यानुसार राजघराण्यातील जांभळा रंग कोणी वापरला तर त्यास दंड, संपत्ती जप्ती वा थेट मृत्यूची शिक्षा दिली जायची.
जांभळा रंग इतका महाग होता की यास परिधान करणारा राजाच्या समान होण्याचा दावा मानला जायचा.या सामाजिक व्यवस्था आणि राजाच्या सत्तेला धोका मानला जायचा.
सम्राट संपूर्ण जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान करायचा.सिनेटरच्या पोशाखावर जांभळी पट्टी असायची. नाईट्सला जांभळ्या घड्या असायच्या आणि सर्वसमान्यांना मात्र जांभळा रंगावर बंदी होती.
सम्राट कॅलिगुला याने एका परदेशी राजकुमारला मृत्यूदंड दिला होता. कारण त्याने जांभळा पोशाख घालून थिएटरमध्ये प्रवेश केला होता.
रोमन साम्राज्यानंतर बाईझेंटाईनमध्ये देखील वांगी कलर केवळ सम्राटासाठी राखीव होता,'पर्पल-बॉर्न' म्हणजे जांभळ्या वस्रात जन्मलेला म्हणजे उत्तराधिकारी मानला जात असे.
रोमन काळामुळे आजही जांभळा रंग राजसी, लक्झरी आणि शक्तीचे प्रतिक मानला जातो. रॉयल्टी,चर्च आणि ब्रँड हा रंग आजही वापरतात.
रोमन साम्राज्यातही पर्पल रंगाला शिक्षा देऊन हे सिद्ध केले की एक साधारण रंग देखील समाजात सत्ता आणि पदाचे प्रतीक बनू शकतो.