या देशात थेट इमारतीतून जाते रेल्वे, पाहा कुठे ?

2 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

चीनच्या चॉन्गक्विंग शहरात असलेले लिझिबा मोनोरेल्वे स्थानक अनोख्या रचनेमुळे प्रसिद्ध आहे. येथे ट्रेन एखा इमारतीतून पास होते. 

लिझिबा मोनोरेल्वे स्थानक एका १९ मजली निवासी इमारतीत बांधण्यात आले आहे. ट्रेन इमारतीच्या मधून धावताना दिसते.

या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर स्टेशनचा हॉल, तर आठव्या मजल्यावर ट्रेन थांबण्यासाठी फलाट आहेत.

हे स्टेशन चीनमधील चॉन्गक्विंग रेल ट्रान्झिस्टचा लाईन - २ चा भाग आहे.

ट्रेनच्या आवाजाचा रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मोनोरेलमध्ये रबराचे टायर वापरले जातात. त्यामुळे ट्रेनमुळे होणारा आवाज आणि कंपने कमी होतात.

जागेची बचत करण्यासाठी इमारत आणि रेल्वे स्थानकाचे काम एकाच वेळी नियोजन करुन करण्यात आले आहे.

इमारतीतून जाणारी ट्रेन पाहण्यासाठी जगातील पर्यटक या स्थानकाला भेट देतात. हे ठिकाणी चीनचे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनले आहे.