17 september 2025
Created By: Atul Kamble
भोपाळ्याच्या बियात प्रोटीन,फायबर,कॉपर,मॅगनीज,मॅग्नेशियम, फॉस्फरस,झींक,आयर्न,फोलेट, रायबोफ्लेविन,फ्लेवोनॉयड्स भरपूर असते
पंपकीन सीड्सने हार्ट हेल्थ चांगली होते.ब्लड शुगर नियंत्रित होते.पचनास चांगले असते,झोपही चांगली येते. याने अनेक फायदे होतात.याचा डाएटमध्ये कसा समावेश करायचा ते पाहूयात..
पंपकिन सीड्स ट्रेल मिक्स म्हणजे इतर नट्स आणि सीड्स सोबत मिक्स करुन खाऊ शकतो. यास क्रंची करण्यासाठी हलके रोस्ट करावे
वेगवेगळ्या सूपमध्ये स्प्रिंकलर करुन खाऊ शकतो. त्यामुळे क्रिमी टेक्सचरमध्ये एक चांगली नटी स्वाद मिळून क्रंचीनेस वाढेल.
पंपकिन सीड्स सलाडच्या ड्रेसिंगमध्ये वापरु शकता.त्यामुळे सलाडची पोषण व्हॅल्यू वाढते आणि चवही वाढेल.
पंपकिन सीड्सना योगर्ट वा ओटमिलमध्ये मिक्स करुन खाऊ शकता.त्यामुळे चवही लागेल आणि ब्रेकफास्टला चांगला ऑप्शन मिळेल.
पंपकिन सीड्सना ग्रेन बाऊल उदा.किनोआ सलाड,राईस बाऊलमध्ये स्प्रिंकलर करुन खाऊ शकता.वा स्टर फ्राय केलेल्या भाज्यात याला मिक्स करु शकता