अंजू राजस्थानमधील भिवडीत पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राहत होती.

30 November 2023

राजस्थानमधून 21 जुलै 2023 रोजी ती पाकिस्तानात गेली. 

अंजू पाकिस्तानातून फातिमा बनून परत भारतात आली आहे. 

भारतात आल्यावर अंजूने पाकिस्तानचे कौतूक चालवले आहे. त्याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पाकिस्तानात गेल्यावर नसरुल्लाह याच्यासोबत अंजू हिने लग्न केले होते. 

अंजू आपला पहिला पती अरविंदसोबत घटस्फोट घेण्यासाठी आली आहे. 

भारतात आल्यावर आयबीकडून अंजूची कसून चौकशी करण्यात आली. 

पाकिस्तानी लष्करासोबत आपले कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचे अंजूने चौकशीत सांगितले.