खरंच हत्ती विकणे किंवा विकत घेणे लिगल असते का? एका हत्तीची किंमत किती?

7 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सध्या कोल्हापूरच्या हत्तीणीच्या विषय बराच चर्चेत आहे

पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की खरंच हत्ती विकत घेणे लिगल आहे का?

होय हत्ती विकत घेता येतो आणि विकलाही जातो

हत्तीची किंमत ही वय, लिंग, आरोग्य आणि त्याच्या क्षमता यावरुन ठरत असते. लहान हत्तींपेक्षा प्रौढ हत्ती हे जास्त महाग असतात.

नर हत्ती हे मादी हत्तींपेक्षा जास्त किंमतीचे असू शकतात. त्याचं कारण हत्तींचे मोठ्या आकाराचे दात.

निरोगी आणि प्रशिक्षित हत्तींना जास्त मागणी असते.

एका वृत्तानुसार काही वर्षांपूर्वी एका हत्तीची किंमत 10 लाख रुपये होती.

परंतु सद्य घडीला एका हत्तीची किंमत 10 कोटी रुपये आहे. ही किंमत अनधिकृत माहितीवर अवलंबून आहे.

हत्तीचे दात मौल्यवान असतात. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दातांना मोठी मागणी असते