घरटे बनवणारा हा एकमेव साप, आहे खूप विषारी

24 october 2025

Created By: Atul Kamble

किंग कोब्रा पृथ्वीवरील एक विषारी साप मानला जातो.जर हा कोणाला चावला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो

हा साप इतर सापांची शिकारही करतो.त्यात क्रेट अन्य कोब्रांचा समावेश असते.काय आहेत याची वैशिष्ट्ये पाहूयात

किंग कोब्रा याचे सरासरी आयुष्य २० ते २५ वर्षांचे असते. परंतू त्याचे योग्य पालनपोषण केले तर ते ३० वर्षेही जगतात

त्यांच्या वयावर पर्यावरण, अन्नाची उपलब्धता आणि शिकारी प्राण्याचा प्रभाव पडतो

 किंग कोब्रा एकमेव साप आहे जो अंडी देण्यासाठी स्वत:घरटे बनवतो

मादी कोब्रा सुखलेली पाने, फांद्यांचे घरटे बनवून अंड्यांची सुरक्षा करते आणि ती फूटेपर्यत पहारा देते

किंग कोब्राला तर आजूबाजूस संकट जाणवले तर तो शरीराचा एक तृतीयांश भाग वर उचलून उभा राहू शकतो

याचे फणा पसरुन फुत्कार टाकणे त्यास आणखीन धोकादायक - भीतीदायक बनवते

किंग कोब्रा जमीन सरपटणे,पाण्यात पोहणे आणि झाडावर चढण्यात माहिर आहे.तो शिकारीसाठी नदी,दलदल आणि जंगलात फिरतो.

किंग कोब्राची पचनशक्ती मंद आणि परिणामकारक असल्याने ते शिकार केल्यानंतर आठवडा ते महिनाभर उपाशी राहू शकतात.