जर तुमच्या घरी नागा साधू कधी भिक्षा मागायला आले तर त्यांना विन्मुख पाठवू नये. त्यांना भिक्षा अवश्य द्या . कारण ते दिवसभरात मोजक्या घरांतच भिक्षा मागतात.
नागा साधूंची परंपरा आहे की ते दिवसभरात फक्त 7 घरात अन्न मागतात. त्यामुळे त्यांना जेवण देताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.
नागा साधू एका दिवसांत केवळ सात घरात अन्न मागतात. ते त्यांच्या नियमांपैकी एक आहे. सात घरातून अन्न मिळालं नाही तर ते त्या दिवशी उपाशी राहतात.
नागा साधू हे भिक्षा मागताना कोणालाही आग्रह करत नाहीत व दबाव टाकत नाहीत. जे मिळतं ते घेऊन नागा साधू संतुष्ट राहतात.
तुम्ही नागा साधूंना जेवण देत असाल तर गरमागरम अन्न द्यावे. कारण ते लोक कल्याणासाठी कठीण नियमांचे पालन करतात.
नागा साधूंना गरम जेवण देणं हे पुण्याचं काम मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळते आणि ते लोकांना सुखी आयुष्यासाठी आशीर्वाद देतात.
नागा साधू दिवसभरात एकदाच भोजन करतात. त्यांचं जेवण शाकाहारी आणि सात्विक असतं. त्यामध्ये कंदमुळं, फळं, पालेभाज्यांच्या समावेश असतो.