जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?

जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?

22nd April 2026

Created By: Aarti Borade

इटलीचे नेपल्स शहर आधुनिक पिझ्झाचे जन्मस्थान मानले जाते

१८ व्या शतकात याच शहरात साध्या पिठाच्या पोळीवर विविध पदार्थ टाकून पिझ्झा बनवण्यास सुरुवात झाली

येथील प्रसिद्ध 'मार्गेरिटा पिझ्झा' १८८९ मध्ये राणी मार्गेरिटाच्या सन्मानार्थ तयार करण्यात आला होता

नेपल्समधील पिझ्झा बनवण्याच्या कलेला UNESCO कडून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे

येथील पिझ्झा त्याच्या मऊ, पातळ कडा आणि ताज्या साहित्यासाठी जगभर ओळखला जातो

खऱ्या नेपोलिटन पिझ्झासाठी आजही लाकडी भट्ट्यांचा आणि पारंपरिक पद्धतींचाच वापर केला जातो