परवेझ मुशर्रफ यांचा फेब्रुवारी 2023 मध्ये आजारामुळे मृत्यू झाला होता.

08 November 2023

मुशर्रफ यांच्या मृत्यनंतर नऊ महिन्यांनी त्यांच्या मृत्यूसंदर्भातील शिक्षेवर सुनावणी होणार आहे. 

देशद्रोह आणि इतर आरोपांवर मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने मृत्यू दंड दिला होता. 

17 डिसेंबर 2019 रोजी परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहच्या आरोपावरुन मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.

9 जानेवारी 2020 रोजी उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द ठरवली होती.

लाहोर उच्च न्यायालयाच्या या निर्णयास 13 जानेवारी 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात शुक्रवार 10 नोव्हेंबरपासून सुनावणी होत आहे.