एखाद्याला 'छपरी' म्हणण्याआधी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ
21 July 2025
Created By: Swati Vemul
एखाद्याला हिणवण्यासाठी किंवा रागाच्या भरात अनेकांकडून 'छपरी' या शब्दाचा होतो वापर
पण तुम्हाला माहितीये का, छप्परबंद नावाचा एक समुदाय देखील आहे
असं मानलं जातं की ते मुघल सैन्यासोबत आले आणि त्यांनी संरक्षण छावण्यांसाठी तात्पुरतं छप्पर बांधलं
नंतर त्यांना पुण्यातील एका वसाहतीत स्थायिक केलं, ज्याला 'छप्परबंद लेन' म्हटलं गेलं
ब्रिटीश काळात छप्परबंद समुदायाची अनेकदा खोट्या प्रकरणांमध्ये (जसं की बनावट नाण्यांची तस्करी) बदनामी केली जायची
'गुन्हेगार जमाती कायद्या'अंतर्गत त्यांना जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित केलं जायचं
हे आता भारताच्या De-notifired Tribes मध्ये येतं, छप्परबंद समुदायाचे लोक छतांवर छप्पर टाकण्याचं काम करायचे
हिंदीत, छापर शब्दाचा अर्थ छत आणि फारसीमध्ये बंदचा अर्थ बांधणारा आणि बनवणारा असा होता
छप्परबंद हे प्रामुख्याने वायव्य कर्नाटकात, विजापूर, धारवाड, बेळगाव, कोल्हापूर आणि सोलापुरात आहेत
काही वर्षांपूर्वीपर्यंत हा समुदाय भूमिहीन होता, ज्यांचे बरेच लोक शेतमजूर किंवा शहरी रोजंदारीवर काम करायचे
त्यापैकी मोठ्या संख्येने आता ट्रक ड्राइव्हर, सुतार, गवंडी, फळ विक्रेते आणि दुकानदार म्हणून काम करतात
भंडारदऱ्यातील 'या' 6 धबधब्यांना आवर्जून भेट द्या!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा