2 november 2025
Created By: Atul Kamble
जगात एकूण मांस विक्रीत चिकन वा बीफचा नंबर वन असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार डुकराचे मांस (Pork) जगात सर्वाधिक खाल्ले जाते.
जगात एकूण मांस विक्रीच्या ३६ टक्के प्रमाण डुकराच्या मांसाचे आहे.
डुकराचे पालन सोपे असते. अन्य पशूंपेक्षा त्यांची वाढ वेगाने होते.ते कमी पालनपोषण खर्चात जास्त मांस देतात.त्यांचे उत्पादन सर्वात स्वस्त पडते.
आशियात डुक्कर पालन हजारो वर्षांपासून होत आहे.चीन डुकराच्या मांसाचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे.
जागतिक मांस विक्रीत डुकराचे मांस (३६ टक्के) सर्वात पुढे आहे.त्यानंतर पोल्ट्री ( ३३ टक्के ),बीफ (२४ टक्के ) आणि बकरी-मेंढी (५ टक्के) नंबर आहे.
चीनच्या 'चा सिऊ'पासून ब्राझीलच्या 'फेजोआडा'पर्यंत अनेक देशांच्या पाककलेचे ते विभिन्न अंग आहे.
इस्लाम आणि ज्यू धर्मात डुकराचे मांस निषिद्ध आहे. त्यामुळे सौदी अरब आणि इस्राईलमध्ये याचे सेवन खूप कमी आहे.
भारतात धार्मिक,सांस्कृतिक कारणाने डुक्कर आणि बिफचे सेवन मर्यादित आहे.यासाठी येथे चिकन ( पोल्ट्री ) सर्वात जास्त पसंत केले जाते.