जगण्यालाही दिशा मिळेल... बाबासाहेबांचे प्रेरणादायी संदेश वाचा!

11 April 2024

Created By: Shital Munde 

स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो, तोच धर्म मला आवडतो. आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते महान असावं.

झाडाला जशी पाण्याची गरज असते, तशीच विचाराला प्रचार आणि प्रसाराची तेवढीच आवश्यकता असते.

झाडाला पाणीच मिळालं नाही तर ते एकतर सुकून जाईल किंवा मरून तरी जाईल.

कोणत्याही समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली हे महत्त्वाचं आहे.

कायदा आणि व्यवस्था हे शरीराचे औषध आहे. राजकारणामुळे शरीर रोगट बनतं, त्याला औषध दिलंच पाहिजे.

राजकीय अत्याचार हे सामाजिक अत्याचाराच्या तुलनेत काहीच नाहीत

पती आणि पत्नीचे नाते हे सर्वात जवळच्या मित्रासारखे असावे. 

शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलाय.