तरुणपणातच हाडांना ठिसुळ आणि कमजोर बनवतो हा पांढरा पदार्थ

8 November 2025

Created By: Atul Kamble

 हाडांमध्ये दुखणे वा कमजोरी आधी म्हातारपणाची निशाणी मानली जायची. परंतू आजकाल तरुणपणातच ही समस्या येत आहे

आजकाल कोणत्याही वयोगटात हाडांची कमजोरीने लोक त्रस्त आहेत. या पोषणाची कमतरता आणि खराब जीवनशैली जबाबदार आहे.

 आपल्या आहारातील मीठ हा पदार्थ हाडांना डॅमेज करत असतो. त्यामुळे याचे सेवन कमी करायला हवे

जास्त मीठ खाल्ल्याने हाडे कमजोर होत असतात. कमी प्रमाणात मीठ खाल्ले तर हाडे मजबूत होतात

WHO नुसार एक आरोग्यदायी व्यक्तीने रोज ५ ग्रॅमहून अधिक मीठ सेवन करु नये

मीठात सोडीयम असते आणि जास्त सोडियममुळे युरिनच्या वाटे कॅल्शियम निघू लागते.

त्यामुळं रक्तातील कॅल्शियमची पातळी राखण्यासाठी शरीर हाडातून कॅल्शियम खेचू लागते. ज्यामुळे हाडे कमजोर होऊ लागतात.त्यामुळे ऑस्टीयोपोरोसिस सारख्या आजाराचा धोका वाढतो.

 ज्यांना ऑस्टीयोपोरोसिस सारखा त्रास त्यांनी सावधानतापूर्वक मीठाचे सेवन करायला हवे.

 बाहेरील अन्न जसे फ्राईस, बर्गर, चिप्स आणि पॅकबंद पदार्थात मीठाचे प्रमाण जास्त असते. त्याचे सेवन कमी करावे

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी तज्ज्ञांता सल्ला घ्या )