दिवाळीतील लोकप्रिय सोनपापडीचा इतिहास घ्या जाणून

11 November 2023

Created By : Manasi Mande

दिवाळीचा सण उत्साहात सुरू झाला असून भाऊबीजेपर्यंत जण दिमाखात साजरा होईल.

दिवाळीत खाल्ल्या जाणाऱ्या मिठाईमध्ये सोनपापडी अतिशय लोकप्रिय आहे.

साखर आणि बेसन यापासून बनणाऱ्या सोनपापडीला, सोहन हलवा, सोहन पापडी आणि पतीसा अशी अनेक नावे आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात सोनपापडी सर्वात पहिले बनवली गेली, असं म्हटलं जातं.

हळूहळू ती गुजरात, पंजाब आणि राजस्थानमध्येही तयार केली जाऊ लागली. आज ती भारतात सर्वत्र लोकप्रिय आहे.

दिवाळीत सोनपापडी चर्चेत येते, त्यावर अनेक मीम्सही बनतात. उत्तम चवीची ही मिठाई खूप सहज मिळते, त्यामुळे बरेचदा गिफ्ट म्हणूनही दिली जाते.

नीट ठेवली तर सोनपापडी लवकर खराबही होत नाही. बराच काळ त्याची चव चांगली राहते.

आली थंडी, खूप खा अंडी ! पण खरी की बनावट कसं ओळखाल ?