जगातील सर्वात उंच इमारत दुबईमधील बुर्ज खलीफा आहे. 163 मजली या इमारतीची उंची 828 मीटर आहे.
9 May 2025
Created By : Jitendra Zavar
भारतात सर्वात उंच इमारत कुठे आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
भारतामधील सर्वात उंच इमारत मुंबईतील वरळीत आहे. पॅलेस रॉयल टॉवर नावाच्या या इमारतीची उंची 320 मीटर आहे.
महाराष्ट्र रिअल एस्टेट विनियामक प्राधिकरणनुसार या बिल्डींगमध्ये 162 अपार्टमेंट्स आहे. तसेच 84 मजले आहेत.
पॅलेस रॉयल टॉवरचे काम 2008 मध्ये सुरु झाले होते. परंतु कायदेशीर दाव्यांमुळे हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. आता 2025 मध्ये हे काम पूर्ण होणार आहे.
पॅलेस रॉयल टॉवर अतिशय मजबूत काँक्रीटचा (सिमेंट आणि स्टीलपासून बनलेला भक्कम बांधकाम) बनलेला आहे. ज्यामुळे तो जोरदार वारा किंवा सौम्य भूकंपातही त्याचावर काही परिणाम होणार नाही.
इमारतीत 215 मीटर उंच एक मोठे खुले क्षेत्र (अॅट्रिअम) आहे. ते उंचीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या अॅट्रिअमपैकी एक आहे.
इमारतीमध्ये स्वतंत्र पोडियम किंवा इतर इमारत नाही. यामुळे पार्किंग आणि इतर सुविधा खालच्या मजल्यांवर डिझाइन केल्या आहेत.