केवळ 7 कोटी लोकसंख्येच्या या देशात सर्वाधिक सिंह राहतात.

27 November 2025

Created By: Atul Kamble

जगात सिंहाची लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.परंतू एका देशाने यात बाजी मारली आहे.

जगात एक असाही देश आहे जेथे सर्वात जास्त सिंह आहेत. या देशाचे नाव टांझानिया आहे. विशेष म्हणजे या देशाची लोकसंख्या 7 कोटी आहे.

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या रिपोर्टनुसार सिंहाच्या संख्येत टांझानियाचा पहिला क्रमांक असून येथे 14,500 सिंह आहेत

सिंहाच्या संख्येच्या बाबतीत टांझानियाच्या नंतर द.आफ्रीका दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सिंहांची संख्या 3,284 इतकी आहे.

 बोत्सवानात 3063,केनियात 2525,जाम्बियात 2349, झिम्बाब्वेत 1362, इथिओपियात 1239 आणि द.सुदानमध्ये 866 सिंह आहेत. 

 सिंहाच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगात 11 वा क्रमांक आहे. भारतात सिंहाची संख्या 674 इतकी आहे.