जगातील सर्वात श्रीमंत शहजादी,औरंगजेबची बहिण जहाँआरा जिने लग्नच केले नाही

08 April 2025

Created By: अतुल कांबळे

दिल्लीचा बादशहा शहाजहान आणि मुमताज महल यांना दोन मुली होत्या जहाँआरा आणि रोशनआरा

जहाँआरा हीने कधी लग्न केलेच नाही.तिला तिच्या पसंतीचा कोणी मिळालाच नाही असे म्हणतात

जहाँआरा हिने लिहून ठेवलेय की नुरजहाँ हिचा चेहरा आई मुमताजपेक्षा सुंदर होता,पण आई मुमताजही कमी सुंदर नव्हती

जहाँआरा ही धार्मिकवृत्तीची होती.तिने वडील शहाजहान वारल्यानंतर आपला भाऊ औरंगजेबशी जुळवून घेतले

जहाँआरा हिला पादशाह बेगम म्हणून जाहीर केले होते,ती त्याकाळातील जगातील सर्वात श्रीमंत महिला होती

जहाँआरा जेव्हा अंथरुणाला खिळली तेव्हा तिने तिची कब्र दिल्लीत सूफी संत निजामुद्दीन औलिया मजारजवळ असावी अशी इच्छा व्यक्त केली

जहाँआरा हीने एक शेर लिहीलाय, "बग़ैर सब्ज़ा न पोशद किसे मज़ार मिरा,कि क़ब्र पोश ग़रीबां हमीं गयाह वो बस अस्त"

या शेरचा अर्थ माझ्या मजारला सब्जाशिवाय कोणत्याही वस्तूने झाकू नये,कारण गरीबांना मजारसाठी हे गवतच पुरेसे आहे

अशाप्रकारे मुगल साम्राज्याच्या सर्वात श्रीमंत राजकन्येने स्वत:ला गरीब म्हणत मकबऱ्याविना जगाचा निरोप घेतला होता

औरंगजेबने देखील त्याची कबर त्याचे गुरू सैय्यद सैनुद्दीन सिराजी याच्या कबरी शेजारी असावी असे लिहून ठेवले होते

प्रेमानंद महाराजांचे गाव कोणते आहे ?