बद्धकोष्ठतेपासून आराम  देतील या 5 बिया..

4 september 2025

Created By: Atul Kamble

 चुकीच्या आहाराने पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्या निर्माण होतात

त्यामुळे लोक आवडते पदार्थ खात नाहीत. पोटाची समस्या दूर करण्यासाठी महागडी औषधे खातात.तरीही आराम मिळत नाही.

आज आपण अशा 5 बिया पाहणार आहोत, ज्याने पोटाचे आरोग्य चांगले रहाते

जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पोट फुगणे आणि अपचनापासून सुटका होते

बडीशेपमध्ये फायबर, पोटॅशियम, एंटीऑक्सीडेंट्स सारखे जरुरी तत्वं असतात.याने पोट साफ होते.

 तिळात फायबर भरपूर असते.ज्यामुळे पचनास मदत होते.यात कॅल्शियम आणि झिंक असते ती हाडांना मजबूत करते

भोपाळ्याच्या बियात फायबर,झिंक आणि एंटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते.याने पोटाचे आरोग्य आणि इम्युनिटी वाढते.यातील ट्रिप्टोफॅन आणि मॅग्निशियमने झोप चांगली येते

 आळशीच्या बिया पचनासाठी चांगल्या.यात फायबर असते. ते पचनशक्ती वाढवून बद्धकोष्ठता दूर करते

चिया सीड्समध्ये अनेक पोषक तत्व असतात.यातील फायबर पचनास मदत करते.बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )