सकाळी लवकर उठवत नाही ? हे उपाय नक्की येतील कामी
09 September 2024
Created By : Manasi Mande
लवकर निजावं आणि लवकर उठावं असा सल्ला वडीलधारी मंडळी नेहमी देतात. (Photo : Freepik / Social Media)
सकाळी लवकर उठणं तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर असतं.
पण बऱ्याच लहान मुलांना, मोठ्यानांही सकाळी लवकर उठवत नाही,डोळे उघडतच नाहीत.
3-4 गजर लावूनही अनेकांना सकाळी लवकर उठता येत नाही.
वृंदावनचे प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांनी त्यावर उपाय सांगितला.
4 ते 6, या वेळेत ब्राह्ममुहूर्तावर उठण्यासाठी त्यांनी सोपा उपाय सांगितला.
सकाळी लवकर उठता न येणं हे फक्त मनाचे खेळ आहेत. ठाम इच्छाशक्ती असेल तर हमखास सकाळी लवकर जाग येईल.
सकाळी लवकर उठण्यासाठी इच्छाशक्ती हवीच, पण नियमांचे पालनही करायला हवे. रात्री झोपण्यापूर्वीच सकाळी लवकर उठायचा निश्चय केला तर जाग येईलच.
सकाळी लवकर उठायचं असेल रात्री लवकर झोपणंही तितकंच महत्वाचं आहे. वेळेवर झोपाल तर वेळेवर जाग नक्की येईल.
गॅस सिलिंडरची बचत करणं सोप्पं, घरात ‘या’ टिप्स लिहून ठेवाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा