शरीरास व्हिटॅमिन B 12 ची गरज असते. व्हिटॅमिन B 12 नर्वस सिस्टम, रेड ब्लड सेल्स आणि डीएनए बनवण्यास मदत करते.

16 March 2025

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्याच्या कमतरतेमुळे रक्ताच्या कमतरतेचा एनीमिया होतो. 

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. तसेच ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा आजार होऊ शकतो. 

व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेचा परिणाम मानसिक आजारावर होतो. त्यामुळे बुद्धीमत्तेवर परिणाम होतो अन् डिमेंशियासारखी समस्या होवू शकते.

शरीरात व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर करण्यासाठी दह्यासोबत जवस खाणे फायदेशीर आहे.

दह्यात व्हिटॅमिन B 12 मुबलक प्रमाणात आहे. तसेच जवसमध्येही व्हिटॅमिन B 12 आहे. हे दोन्ही सोबत खाल्यानंतर शरीरात व्हिटॅमिन B 12 चा स्तर वेगाने वाढेल. 

जवस मिक्सरमध्ये दळून तिची एक चमचा पावडर दह्यात मिक्स करा. त्यात मधसुद्धा मिक्स करु शकतात. तुमच्या नियमित डायटमध्ये त्याचा समावेश करा.