व्हिटॅमिन B 12 शरिरासाठी महत्वाचे पोषक तत्व आहे. शरिराच्या विकासासाठी ते महत्वाचे आहे.

31 January 2025

नियमित व्हिटॅमिन B 12 ची एक कॅप्सूल घेतल्यास अनेक फायदे होतात. 

 

व्हिटॅमिन B 12 शरिरात एनर्जीचे प्रमाण वाढवते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येत नाही. 

 

व्हिटॅमिन B 12 चेतासंस्थांसाठी महत्वाचे आहे. हे मेंदूच्या नसा निरोगी ठेवते आणि विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती वाढते.

 

व्हिटॅमिन बी 12 शरीरात ब्लड सेल्स तयार करते. त्यामुळे रक्त सर्कुलेशन सुधारते. पर्यायाने शरीराच्या अवयवांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होण्यास मदत होते.

 

व्हिटॅमिन बी 12 शरीरातील होमोसिस्टीन नावाच्या घटकाची पातळी कमी करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

 

व्हिटॅमिन बी 12 हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच ऑस्टियोपोरोसिस म्हणजेच हाडांच्या आजारापासून बचाव करते.