स्वप्नात स्मशान दिसलं तर काय होतं ? काय असतो अर्थ ?

6 March 2025

Created By : Manasi Mande

आपल्याला झोपेत, स्वप्नात जे दिसतं, स्वप्नशास्त्रानुसार त्याचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. मग तो शुभ असो किंवा अशुभ.

अनेक वेळा लोकांना स्वप्नात स्मशान घाट दिसतो, ज्यामुळे कोणालाही भीती वाटू शकते. मात्र स्वप्नात स्मशान दिसण्याचा अर्थ काय असतो ?

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात स्मशान दिसणं हे शुभ मानलं जातं. हे स्वप्न भविष्यात होणाऱ्या प्रगतीचे संकेत देतात.

स्वप्नात स्मशान दिसणं म्हणजे तुमच्या घरात सुख-शांती नांदेल आणि लवकरच तुम्हाला यश मिळेल.

स्वप्नशास्त्रानुसार, एखाद्याला स्वप्नात स्मशान घाट दिसला तर पुढील काळात धन लाभ आणि जीवनात सुखाचे संकेत मिळतात.

स्वप्नात स्मशान दिसणं म्हणजे  त्याचा इशारा असतो की तुम्हाला एखाद्या गंभीर आजारापासून सुटका मिळेल असे मानले जाते.

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पेटलेली चिता दिसणं हे अशुभ असतं.  एखाद्या जवळच्या व्यक्तीशी भांडण किंवा नातं बिघडण्याचे हे संकेत असू शकतात.