10 May 2025

Created By : Jitendra Zavar

कच्या दुधात अनेक पोषक तत्व असतात. त्यात प्रोटीन, कॅल्शियम, फॅटी एसिड्स अन् व्हिटॅमिन असते. 

दूध हाडे मजबूत करते. त्याचप्रमाणे त्वचाही चांगली ठेवते. त्वचेसाठी दूध खूप फायदेशीर आहे. 

दुधात एक्सफोलिएटिंग गुण असतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार राहतो. 

कच्चे दूध त्वचेच्या आत ओलावा ठेवते.  रात्रभर चेहऱ्यावर दूध ठेवल्याने कोरडी त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. त्यामुळे त्वचा बाळासारखी मऊ होते.

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी दूध देखील प्रभावी आहे. दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड डेड त्वचा काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.

चेहऱ्यावरील डागही कच्या दुधाच्या वापरानंतर जातात. त्याचा वापरामुळे पिग्मेंटेशन, टॅनिंग, सुरकुत्या हलके होतात. दूध त्वचेचा रंग एकसारखा करते.

पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर देखील करू शकता.  कच्च्या दुधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेवर असलेले बॅक्टेरिया कमी करतात आणि मुरुमांची समस्या कमी होते.

दूध त्वचेच्या पेशींना पोषण देते आणि त्वचा चांगली ठेवते. ज्यामुळे ती मजबूत आणि तरुण दिसते. तसेच, कच्चे दूध नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते आणि त्वचा स्वच्छ करते.