जया किशोरी यांचं खरं नाव काय ?

24 February 2025

Created By : Manasi Mande

जया किशोरी या कथावाचक आणि भजन गायिका आहेत. खास अंदाजात कथा ऐकवण्यासाठी त्या देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. लहान-थोर सर्वांना त्या आवडतात.

कथावाचक जया किशोरी या नावाने लोकं त्यांना ओळखतात, पण ते त्यांचं खर नाव नाही. त्यांचं खर नाव जया शर्मा आहे. राजस्थानच्या एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला.

लहानपणापासून त्या अध्यात्मिक वातावरणात वाढल्या. आजोबांकडे त्या श्रीकृष्णाच्या कथा आणि त्याच्या लीलांबद्दल गोष्टी ऐकायच्या.

6-7व्या वर्षांपासून त्यांनी आध्यात्मिक प्रवासाची सुरूवात केली. 9 व्या वर्षीच त्यांना लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्र, मधुराष्टकम्, शिल पंचाक्षर स्तोत्रम्, अशी अनेक स्त्रोत्र तोंडपाठ होती  असं म्हटलं जातं.

जया किशोरी यांच्या गुरूंचे नाव गोविंद राम मिश्रा असून त्यांच्याकडून जया किशोरी हे नाव मिळालं. श्रीकृष्णाप्रती असलेली आस्था आणि प्रेमामुळे त्यांना ही उपाधि देण्यात आली.

त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की गुरूजी मला किशोरी म्हणतात. घरात मुलगा असेल तर त्याला कृष्ण म्हणतात आणि मुलगी असेल तर तिला राधा म्हणतात. तसं ते मला किशोरी म्हणतात.