घरात प्राणी पाळणं हे फक्त आनंददायी नसतं तर ते वास्तू शास्त्रानुसारही शुभ असतं. काही प्राणी घरात सकारात्मक उर्जा वाढवतात आणि सुख-समृद्धी आणतात.
कुत्रा हा प्रामाणिकपणा, सुरक्षा आणि सकारात्मक उर्जेचं प्रतीक मानला जातो. कुत्रा पाळल्याने शनिदोष कमी होतो असं म्हणतात.
हिंदू धर्मात गाईला पवित्र मानलं जातं, तिला आईचा दर्जा दिला जातो. घरात गाय असल्यास पितृदोष आणि वास्तू दोष समाप्त होतात. समृद्धी येते.
मासे हे सौभाग्य, समृद्धीचे प्रतीक मानले जातात. घरात अक्वेरियम असेल तर मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक उर्जा संपते.
पोपट हा सौभाग्य, प्रेम, सुख शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे घरात चांगलं वातावरण राहतं आणि नकारात्मकता कमी होते.
मांजर ही अनेकांना अशुभ वाटते पण हा चुकीचा विचार आहे. वास्तू शास्त्रानुसार, घरात पांढऱ्या रंगाची मांजर पाळल्यास सकारात्मकता वाढते आणि घरात समृद्धी येते.
ज्योतिष शास्त्रानुसार, घरात ससा पाळणं खूपच शुभ असतं. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते असं म्हणतात.