देशातील अनेक शहरांचे आपआपले वैशिष्ट्ये आहे. त्या शहरांना एक संस्कृती आहे.
12 April 2025
Created By : Jitendra Zavar
काही शहरे त्या ठिकाणी मिळत असलेल्या पदार्थावरुन प्रसिद्ध झाली आहेत. तसेच चहानगरी म्हणून देशातील एक शहर प्रसिद्ध आहे.
देशातील या चहानगरीत देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येतात. त्या ठिकाणी मिळणाऱ्या चहाचा स्वाद प्रत्येक पर्यटक घेतात.
चहाच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. देशात होणाऱ्या चहा उत्पादनापेक्षा चहाची चव घेण्याऱ्यांची संख्या जास्त आहे.
आसाममधील डिब्रूगढ या शहराला भारताची चहा नगरी म्हटली जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर चहाचे उत्पादन होते.
डिब्रूगढला चहानगरी म्हणण्याचे कारण देशाच्या उत्तर भागात सर्वाधिक चहाचे म्हणजे 83 टक्के उत्पादन होते. त्यात डिब्रूगढचा मोठा वाटा आहे.
दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात चहाचे उत्पादन होते. देशात होणाऱ्या उत्पादनापैकी ते 17 टक्के आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस पाळण्याचा ठराव समंत केला आहे. त्यामुळे जगभरात हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा होतो.
Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.