पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एअर इंडिया वन बोइंग 777-300ER विमान वापरले जाते.

12 May 2025

Created By: जितेंद्र झंवर

एअर इंडियाचे हे विमान हवाईदल ऑपरेट करते. हे विमान गरजेनुसार कस्टमाइज केले जाते. 

पंतप्रधानांसाठी असलेले हे विमान सुरक्षेच्या दृष्टिने अमेरिकेच्या एअरफोर्स वन पेक्षा कमी नाही. 

एअर इंडियाचे हे विमान एडवान्स कम्युनिकेशन सिस्टमने सज्ज आहे. त्यातून ऑडियो-व्हिडिओ कम्युनिकेशन फंक्शनची सुविधी मिळते.

एअर इंडियाच्या या विमानात क्षेपणास्त्र एप्रोच वॉर्निंग सिस्टम आहे. त्यामुळे सेन्सरच्या माध्यमातून पायलट इतर क्षेपणास्त्रावर हल्ला करु शकतो. 

एअर इंडिया वनमध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर जॅमर आहे. त्यामुळे शत्रूंचे जीपीएस आणि ड्रोन ब्लॉक होते. 

विमानात डायरेक्शनल इंफ्रारेड काउंटरमेजर सिस्टम एंटी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्यामुळे इंफ्रारेड क्षेपणास्त्रापासून विमानाचे संरक्षण होते. 

विमानात हवेत इंधन भरण्याची सुविधा आहे. त्यामुळे एक वेळा इंधन भरल्यावर हे विमान न थांबता 17 तास उड्डान भरु शकते. 

पंतप्रधानांचे हे विमान न थांबता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्त्रायल, कॅनडा यासारख्या देशापर्यंत जाऊ शकते.