घरात फॅमिली फोटो लावताय ? चुकूनही या दिशेला लावू नका फोटो

28 February 2025

Created By : Manasi Mande

प्रत्येक व्यक्तीचं कुटुंबियांवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम असतं. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण फोटोच्या रुपात कैद करून घरात फ्रेम करून लावणं अनेकांना आवडतं.

पण बऱ्याच वेळेस हे फोटो चुकीच्या दिशेने लावले जातात. वास्तू शास्त्रानुसार,चुकीच्या दिशेने फोटो लावल्यास जीवनात दुर्भाग्य येऊ शकतं.

वास्तू शास्त्रात फोटो फ्रेम लावण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. घरात फोटो लावण्यासाठी शुभ दिशा कोणती हे जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार, नैऋत्य दिशेला फोटो फ्रेम लावावी. त्यामुळे नाती ही मजबूत आणि मधुर होतात.

मात्र फॅमिली फोटो चुकूनही पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू नयेत. त्यामुळे घरातल्या सदस्यांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

तर पाणी असलेला फोटो हा उत्तर दिशेला आणि आगीशी संबंधित फोटो दक्षिण दिशेला लावावा.

पूर्वजांचे फोटो घरात नेहमी दक्षिणेला लावावेत.