औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का?
1 March 2025
Created By : Manasi Mande
नुकताच रिलीज झालेल्या "छावा" चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडला जात असताना औरंगजेबाबद्दल चर्चा रंगत आहे.
औरंगजेब ज्या महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होता, त्यालाच मरणानंतर याच भूमीत दफन करण्यात आलं.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचे कट्टर शत्रू असलेल्या मराठ्यांच्या महाराष्ट्रातच त्याची कबर का बांधण्यात आली ? अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे.
औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर ( पूर्वीचे औरंगाबाद) शहरापासून काही अंतरावरील खुल्दाबादमध्ये आहे.
असे म्हणतात की, औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपूर्वी एक मृत्यूपत्र बनवलं होतं. त्यात त्याने त्याची कबर कशी असावी याबाबत स्पष्ट लिहिले होते.
औरंगजेबाने म्हटले होते की, माझ्या मृत्यूनंतर कोणताही मोठा समारंभ होऊ नये. कोणताही संगीत किंवा शोकसभा आयोजित करू नये.
माझ्या कबरीवर कोणतीही भव्य वास्तू उभारली जाऊ नये. माझी कबर साध्या चौथऱ्याप्रमाणे उघड्या जागेत असावी. कुठलीही सावली माझ्या कबरीवर पडू नये.
याच इच्छेनुसार, खुल्ताबाद येथे त्याची अत्यंत साध्या पद्धतीने कबर बांधण्यात आली आहे.
पूजा करताना कोणत्या हाताने वाजवावी घंटा ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा