पुणे आणि मुंबई शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

20 November 2023

पुणे शहरातील २७ पैकी बहुतांश रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. 

दिवाळीमुळे असलेली सुट्टी, अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

दिवाळी आणि उन्हाळा या दोन्ही सुट्ट्यांमध्ये पुणे, मुंबई शहरात रक्ताची कमतरता निर्माण होते असते. 

मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्येही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.

नव्याने रक्तदान करण्याचे आवाहन आता करण्यात आले आहे.