कोणत्याही देवळात गेल्यावर आपण नमस्कार करतो, बरेच लोकं तर साष्टांग नमस्कारही घालतात.
नमस्कार करताना शरीराची आठही अंग, जमीनीला स्पर्श करतात म्हणूनच याला साष्टांग नमस्कार म्हणतात.
हा कायिक नमस्काराचा प्रकार मानला जातो, ज्यामध्ये आपलं संपूर्ण शरीर भक्तिभावाने लीन होतं.
पुरुषांसाठी साष्टांग नमस्काराची पद्धत वेगळी असते तर महिलांनी मात्र साष्टांग नमस्कार घालू नये असं म्हणतत.
स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये अशी धार्मिक मान्यता आहे. त्याऐवजी त्यांनी पंचांग नमस्कार घालावा.
त्यामध्ये कपाळ, दोन्ही हात आणि दोन्ही गुडघे हे जमिनीला टेकतात.
स्त्रियांचे गर्भाशय आणि वक्ष जमीनीला न टेकण्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोन, त्याचा विशेष अर्थ असून तो पाळला जातो.
स्त्रिया गर्भातून नव्या जीवाला जन्म देतात आणि वक्षातून त्याचे संगोपन व पालन करतात. म्हणून स्त्रियांनी अष्टांग नमस्कारात वक्ष आणि गर्भ जमिनीला न लावता गुडघ्यावर बसून नमस्कार करावा.