भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना नोटांसंदर्भात नुकतेच निर्देश दिले आहेत. त्यानंतर 500 रुपयांच्या नोटांबाबत चर्चा सुरु झाली आहे.

2 May 2025

Created By:  जितेंद्र झंवर

आरबीआयने सप्टेंबर 2025 पर्यंत 75 टक्के एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अपलोड करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. 

आरबीआयला 500 रुपयांच्या नोटांवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. यामुळे दोन हजारानंतर 500  रुपयांची नोट देखील बंद होईल का? तज्ज्ञांकडून समजून घेऊया.

बँकिंग तज्ज्ञ अश्वनी राणा यांच्या मते, देशातील एटीएममधून काढल्या जाणाऱ्या रोख रकमेमध्ये आरबीआय 100 आणि 200 रुपयांच्या नोटांवर अवलंबित्व वाढवू इच्छित आहे.

अश्विनी राणा म्हणतात, दोन रुपयांची नोटा चलनातून काढून टाकण्यात आली. त्याचप्रमाणे 500 रुपयांची नोटही चलनातून बाद होईल का? त्याचे उत्तर फक्त रिझर्व्ह बँकच देऊ शकते. पण संकेत तसे आहेत.

बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा यांनी 'टीव्ही 9 डिजिटल'ला सांगितले की, भारतात डिजिटल व्यवहार वेगाने वाढले आहेत. तसेच आरबीआय डिजिटल चलन ई-रुपी सादर करण्याची तयारीत आहे.

आरबीआय चलन छपाईचा खर्चही कमी करायचा आहे. यामुळे रिझर्व्ह बँक एटीएममधून लहान नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणू इच्छिते.

दोन हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे आरबीआय 500 रुपयांच्या नोटांचे चलन हळूहळू कमी करू शकते. जेणेकरून देशात लहान नोटांचे चलन वाढवता येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.