मीठ प्रत्येकाच्या घरातील गरजेची वस्तू आहे. मीठाशिवाय स्वयंपाकाला चव नाही.
16 February 2025
आपण वापरत असलेल्या मीठाची किंमत फारशी नाही. परंतु जगातील सर्वात महाग मीठाची किंमत तुम्हाला माहीत आहे का?
जगात सर्वात महाग मीठ कोरियन बांबू सॉल्ट आहे. त्याबाबतची माहिती अनेकांना नाही. आरोग्यासाठी हे लाभदायक आहे.
कोरियन मीठा बनवण्याची पद्धत खूप अवघड आहे. पोकळ बांबूत हे मीठ भरले जाते. त्यानंतर 400 डिग्री सेल्सियस ते तापवले जाते.
तापवल्यानंतर ते मीठ बाहेर काढून पावरड केली जाते. ही प्रक्रिया नऊ वेळा केली जाते. त्यानंतर हा कोरियन बांबू सॉल्ट तयार होतो.
1 किलो बांबू सॉल्ट बनवण्यासाठी 20 दिवस लागतात. बांबूत तो भाजला जात असल्याने बांबूमधील पोषक तत्व त्यात मिसळतात.
आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे आणि त्यात 73 प्रकारचे पोषक तत्व असल्यामुळे त्याची मागणी वेगाने वाढत आहे.
एक किलो कोरियन बांबू सॉल्टची किंमत 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत जाते. त्याचा रंग पर्पल असतो. त्यामुळे ऑनलाईन वेबसाइटवर पर्पल बांबू सॉल्ट म्हणून तो मिळतो.