वेळेबरोबर AM आणि PM लावणं कधी पासून सुरू झालंय? माहितीये?
19 November
2023
Created By: Harshada Shinkar
दिवस आणि रात्रीची वेळ यासाठी AM आणि PM असे वापरले जाते.
AM आणि PM विशेषतः ट्रेन, विमाने आणि इतर कामांसाठी वापरले जाते.
कोणत्याही वेळेच्या पुढे AM आणि PM दर्शवल्याने दिवस आणि रात्रीची वेळ ठरवता येते.
रात्री 12 वाजल्यापासून दिवसा 11.59 या वेळेसाठी AM वापरले जाते
दुपारी 12 ते 11.59 या वेळेसाठी PM असे वापरले जाते
AM म्हणजे अँटी मेरिडियन आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडिय असते
दिवस आणि रात्रीची वेळ सांगण्यात लोक गोंधळून जायचे. म्हणून AM आणि PM चे स्वरूप निश्चित केले गेले
इजिप्तमध्ये लोक हाताच्या बोटावर वेळ मोजायचे येथूनच २४ तासांच्या वेळेचे स्वरूप ठरवले गेले