Parle-G मधील 'G' चा अर्थ काय? तुम्हाला माहितीये? Genius तर बिल्कुल नाही मग काय..

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

लहान मूल असो वयोवृद्ध, पार्ले-जी बिस्कीट कोणाला आवडत नाही असा व्यक्ती कुणीच नाही

पार्ले-जी बिस्किट कंपनी 1929 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरात सुरू झाली.

या कंपनीने 1938 मध्ये पहिल्यांदा Parle Gluco नावाचे बिस्किट बनवले

सुरुवातीला पार्ले-जीचे नाव पार्ले ग्लुको बिस्किट असे होते.

स्वातंत्र्यानंतर अन्न संकटामुळे उत्पादन बंद झाले होते. मात्र कंपनीने ग्लुको बिस्किटे पुन्हा बाजारात आणली 

इतर कंपन्यांनीही त्यांची बिस्किटे ग्लुको या नावाने विकायला सुरुवात केली अन् स्पर्धा वाढली

म्हणून कंपनीने पार्ले ग्लुको बिस्किटचे नाव लहान करून पार्ले-जी बिस्किट केले.

त्यामुळे पार्ले-जी मधला 'जी' हा जीनियस नाही तर ग्लुकोचा आहे