27 February 2024

27 फेब्रुवारी या तारखेला घडलेल्या देशाच्या इतिहासातील सर्वात 5 मोठ्या घटना

Mahesh Pawar

देशाच्या इतिहासात 27 फेब्रुवारी या तारखेला फार महत्व आहे.

'मेरी झांसी नाही दुंगी', असे म्हणत रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला.

ईस्ट इंडिया कंपनीने 27 फेब्रुवारी 1854 मध्ये झाशी ताब्यात घेतली आणि त्या विरोधात राणी लक्ष्मीबाई यांनी रणशिंग फुंकले.

प्रखर देशभक्त आणि सशस्त्र क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद अल्फ्रेड पार्क मध्ये मित्र सुखदेव राज याच्याशी सल्लामसलत करत होते.

याचवेळी सीआयडी एसएसपी नॉट बाबर हे पोलिसांसोबत तेथे पोहोचले. आझाद यांच्या गोळीबारात तीन पोलीस मारले गेले. 

शेवटी त्यांच्या बंदुकीत एकच गोळी शिल्लक असताना त्यांनी ती गोळी स्वतःवर झाडून हौतात्म्य पत्करले. तो दिवस होता 27 फेब्रुवारी 1931.

27 फेब्रुवारी 1981 या दिवशी गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले. अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनला आग लावण्यात आली होती.

2010 मध्ये याच दिवशी मध्य चिलीमध्ये 8.8 तीव्रतेचा भूकंप आणि सुनामीचा धक्का बसला. यात 500 लोक मारले गेले तर 8 लाख लोक बेघर झाले.

27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन यांना पकडले होते.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स