4 March 2024

20 वर्षानंतर या गोष्टी बघायलाही मिळणार नाहीत, कारण...

Mahesh Pawar

अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आधी अत्यंत उपयुक्त आणि महत्वाच्या होत्या आज त्यांची जागा दुसऱ्या साधनांनी किंवा वस्तूंची घेतली आहे.

मात्र. यातही अशा खूप गोष्टी आहेत की ज्या भविष्यात लुप्त होऊ शकतात. त्या पुन्हा कधीच दिसू शकणार नाहीत.

क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड भविष्यात लुप्त होऊन सर्वत्र ऑनलाइन पेमेंट येऊ शकेल. कॅश पेमेंटही कमी होऊन छोटे मोठे व्यवहार कॅशलेस होतील.

सध्या स्वयंचलित वाहने येऊ घेतली आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्यास ड्रायव्हरची गरज भासणार नाही.

आज इंधन म्हणून वापरण्यात येणारे पेट्रोल, डिझेल किंवा CNG लुप्त होऊन इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडया येण्याची शक्यता आहे.

भविष्यात पासवर्ड जाऊन येणारे device च आधुनिक असतील. त्यात cross व्हेरिफिकेशनची सोय असेल जेणेकरून पासवर्डची गरज पडणार नाही.

आज घराघरात दिसणाऱ्या वायर्स जाऊन आधुनिक काळात बहुतांशी वस्तू या इंटरनेट कनेक्ट असून वायरलेस होतील.

मोबाइल फोन अधिक प्रचलित होत आहेत त्यानुसार पारंपारिक लँडलाइन फोन कमी होऊन टप्प्याटप्प्याने लुप्त होतील.

की लेस एंट्री सिस्टम आणि स्मार्ट लॉक लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे घर, कार आणि इतर लॉक केलेल्या वस्तूसाठी पारंपारिक चावी दिसणार नाही.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स