27 February 2024
Mahesh Pawar
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा 1 ते 3 मार्च असे तीन दिवस रंगणार आहे.
प्री-वेडिंग सोहळ्यासाठी देशातील आणि जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात उपस्थित व्यक्तींच्या मनोरंजनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचे अनेक गायक आपल्या आवाजाने पाहुण्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग हा आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ हे ही आपल्या सुरांनी प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना देखील अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या पार्टीत लोकांना तिच्या सुरांवर नाचण्यास भाग पाडेल.
प्रसिद्ध गायक अरिजित सिंग आणि रिहाना हे पार्टीत सामील होणार आहेत. या दोघांची जुगलबंदी पाहुण्यांना ऐकायला मिळणार आहे.
प्रसिद्ध जादूगार डेव्हिड ब्लेन हे देखील आपल्या अप्रतिम जादुगारीने लोकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवणार आहेत.