29 February 2024

बॉलीवूड आणि साऊथचा 600 कोटींचा हिरो, 24 वर्षानंतर पुन्हा करतोय एन्ट्री

Mahesh Pawar

बॉलीवूड आणि साऊथचे असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे फॅन फॉलोइंग संपूर्ण देशात आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अभिनय करून आपली छाप सोडली आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे लाखो चाहते वेडे आहेत.

पण साऊथचा हा दिग्गज सुपरस्टार गेली 24 वर्ष बॉलिवूड चित्रपटांपासून दूर राहिला.

दिग्गज सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला 24 वर्षांचा वनवास संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुन्हा एकदा रजनीकांत बॉलिवूडमध्ये मोठ्या दिमाखात एन्ट्री करणार आहेत.

रजनीकांत यांनी प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांच्यासोबत काम केले आहे.

साजिद नाडियादवाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांनी X अकाउंटवर रजनीकांतसोबतचा एक फोटो शेअर केला.

'महान रजनीकांत सरांसोबत काम करणे हा खरा सन्मान आहे! आम्ही एकत्र या अविस्मरणीय प्रवासाची तयारी करत आहोत! असे त्यांनी म्हटले आहे.

रजनीकांत यांचा बॉलीवूडमधला शेवटचा चित्रपट बुलंदी होता. हा चित्रपट 2000 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

बुलंदीमध्ये रजनीकांत यांच्यासोबत अनिल कपूर, रवीना टंडन आणि रेखा हे मुख्य भूमिकेत होते.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स