15 February 2024

पृथ्वीच्या गर्भात माणूस पोहोचू शकतो का? किती खोल आहे पृथ्वीची खोली? 

Mahesh Pawar

पृथ्वीवर आपण ज्या भागावर राहतो त्याला क्रस्ट (crust plate) आवरण म्हणतात.

संशोधकांच्या मते ही जाडी काही ठिकाणी 8 किमी तर काही ठिकाणी 25 किमी पर्यंत आहे.

त्यानंतर मॅनटल आवरण (mantle plate) येते जे लाव्हा रस रुपात आहे. त्याची जाडी अंदाजे 2900 किमी जाडीची आहे.

संशोधक संशोधनासाठी पृथ्वी खोदण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. त्यासाठी खोलवर ड्रिल करण्यात आले.

रशियामध्ये कोला प्रोजेक्टसाठी (kola superdeep borehole) पृथ्वीचे खोदकाम करण्यात आले होते.

1965 ते 1995 अशी तीस वर्ष हे खोदकाम सुरु होते.

9 इंचाच्या ड्रिलने तीस वर्षात 40,230 फूट ( साधारण 15 किलोमीटर) इतके खोल ड्रिल करण्यात आले. मात्र, त्याखाली ड्रिल करता आले नाही.

कारण पृथ्वीचे तापमान, त्यामुळे आणखी खोल जाणे शक्य नव्हते. त्यामुळे हा प्रोजेक्ट बंद करण्यात आला.

पृथ्वीच्या गर्भात 85 टक्के लोह आणि 10 टक्के निकेल आहे.

पृथ्वीचा गर्भ हा बाह्य पृष्ठभागाखाली सुमारे 5,100 ते 6,371 किलोमीटर आहे.

त्याचा आकार मोठ्या चेंडूसारखा आहे. त्याचा व्यास 1,200 किलोमीटर असल्याचे मानले जाते.

एवढ्या खोलीपर्यंत थेट पोहोचणे सध्या मानवाला शक्य नाही.

पृथ्वीची असीम खोली समजून घेतल्यास, पृथ्वी आणि विश्वाच्या आरोग्याबद्दल बरेच काही जाणून घेता येते.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स